दारुचं व्यसन घर उद्ध्वस्त करतं पण सत्तेची नशा…नागपूरच्या सभेत उध्दव ठाकरे यांची सरकारवर सडकून टीका

नागपूर : दारुचं व्यसन घर उद्ध्वस्त करतं पण सत्तेची नशा
देश उद्ध्वस्त करते असं म्हणत उध्दव ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज नागपूर मध्ये पार पडली. या सभेत बोलताना ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर तोफ डागली.
औरंगाबादनंतर मविआची दुसरी सभा महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये पार पडली. सभेला जमलेली गर्दी पाहून ठाकरे म्हणाले, एका माणसाने देशाला घटना दिली, मग एवढी मोठी जनता बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवू शकत नाही का ? मी घटना बचाव करणार असं म्हणणार नाही तर घटनेचं संरक्षण मीच करणार असं त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल बोलताना ते म्हणाले, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ही आनंदाची गोष्ट असली तरी पण हा पुरस्कार कुणाच्या हस्ते देण्यात आला? असे म्हणत ठाकरे यांनी राज्य सरकारला टोला लगावला.

संविधानावर घाला घालण्याचे काम भाजप करत आहे. ज्या भूमीत बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं आहे. मात्र त्याच भारत मातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचं काम भाजपने सुरु केल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.
उध्दव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
- “तुमचे ‘अंधभक्त’ हे तुमचे सैनिक असू शकतील, पण
माझ्या मातृभूमीचे सैनिक, पुत्र हे पक्षाचे सैनिक होऊ शकत नाहीत, ते माझ्या ‘देशाचे
सैनिक’ आहेत! - “मी घरात बसून कारभार करत होतो, तरीसुद्धा केवळ तुमच्या आणि तुमच्या सहकार्यामुळे तेव्हा देशामध्ये पहिल्या पाचात आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर लागत होता! “
- “मी शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊन येतो, ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि तुम्हाला तुमचा कोण ‘बाप’ निवडायचा तो निवडा आणि या मैदानात!”
- “हे जर रामभक्त असते तर आधी सुरतला गेले नसते,
अयोध्येला गेले असते! खरंच यांच्या धमन्यांमध्ये हिंदुत्व
असतं तर हे गुवाहाटीला गेले नसते, अयोध्येला गेले असते!” - “महाराष्ट्र हा शूरांचा आहे, मर्दाचा आहे!
पाठीमागून वार करणारा आणि शत्रूला पाठ
दाखवणारा महाराष्ट्र नाही! समोरासमोर भिडणारा
महाराष्ट्र आहे!” - “ सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कुणी जरी समोर असला आणि समोर सच्चा समाजसुधारक असला तर त्याच्यासमोर त्याला झुकावंच लागतं हे महाराष्ट्राने
संपूर्ण देशाला दाखवून दिलं आहे!



