पुणे शहर

पुण्यातील शाखाध्यक्षाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना मदत करत मनसे कार्यकर्त्यांनी घालून दिला नवा आदर्श..

पुणे : pune city mns महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरुड मधील शाखाध्यक्ष  विजय पालकर यांचे १ मे रोजी कोरोनामुळे दुःखद निधन झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे पालकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना दोन मुले त्यांचे शिक्षण व उदारनिर्वाह करण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली. त्यामुळे पालकर कुटुंबाला मदतीचा हात मिळावा. म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येत जमा केलेली रक्कम आज पालकर कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली. After the death of the branch president, MNS workers set a new standard by helping their families.

विजय पालकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुटुंबातील ते एक सदस्यच होते. पक्षातील एक पदाधिकारी गेल्याने त्याच्या कुटुंबीयांची जबाबदारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारत त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे ठरवले.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रशांत कनोजिया आणि कोथरूड उपविभाग अध्यक्ष संजय काळे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहरातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी आर्थिक मदत करत सुमारे तीन लाख रुपयांची आर्थिक मदत एकत्रित करून पालकर कुटुंबीयांकडे सुपूर्त केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी कक्षाच्या ‘कोथरूड गड’ या जनसंपर्क कार्यालयामध्ये विजय पालकर यांना श्रध्दांजली वाहुन मदत निधी पत्नी श्रीमती विजया विजय पालकर तसेच वैष्णवी व विराज पालकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.  एखाद्या कार्यकर्त्याचे आकस्मित निधन झालं तर मनसे पक्ष हा एक परिवार म्हणून संबंधित कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहतो हा संदेश या माध्यमातून पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संपूर्ण महाराष्ट्राला दिला आहे.

शर्मिला राज ठाकरे यांनीही ही फोन वर पालकर कुटुंबाशी संवाद साधत सांत्वन करुन आधार दिला. मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी लागणारा टॅब पालकर कुटुंबीयांना सुपूर्त केला तर हेल्प रायडर या संस्थेच्या वतीने त्यांच्या मुलांच्या पुढील शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे.

यावेळी मनसेचे नेते बाबू वागसकर, सरचिटणीस ॲड. किशोर शिंदे, माजी नगरसेविका जयश्री मारणे, पुष्पा कनोजिया, गणेश शिंदे, नितीन गायकवाड,अनिकेत मुरकुटे, सुभाष आमले, अरुण हुलावळे, अमोल शिंदे, महेंद्र जाधव, शशांक अमराळे, श्रीकांत आमराळे, बाळा शिंदे समिर मुलाणी, सतीश कातुलवार यांच्या समवेत कोथरूड सह पुणे शहरातील बहुसंख्य मनसे पदाधिकारी उपस्थित होते. भविष्यात पालकर कुटुंबियांवर कुठलीही समस्या उद्भवली किंवा कुठलीही अडचण आली तर मनसे पक्ष हा कुटुंब म्हणून तुमच्या सदैव पाठीशी राहील असे आश्वासन यावेळी पालकर कुटुंबियांना देण्यात आले.

Img 20210522 wa0203

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये