पुणे शहर

मोरोपंत पिंगळे यांचे जीवनकार्य राष्ट्र कार्यासाठी प्रेरणादायी -गिरीश प्रभुणे

मोतीबाग येथील संघ कार्यालयात मोरोपंत पिंगळे यांच्या प्रतिमेला गिरीश प्रभुणे,राजेंद्र लुंकड यांनी पुष्पहार अर्पण केला. शुक्रवारी सायंकाळी 7 ते 8:30 या वेळात हे व्याख्यान ऑन लाईन झाले . 

Img 20201024 wa0166 1

गिरीश प्रभुणे म्हणाले,’मोरोपंत पिंगळे यांचा सर्व भारतीय समाजाचा सखोल अभ्यास होता.मोरोपंत पिंगळे महाराष्ट्रात कार्यरत झाले तेव्हा आव्हानात्मक परिस्थिती होती.शिवाजी महाराजांच्या गौरवास्पद इतिहासाला मोरोपंत पिंगळे यांनी शिवचरित्र लेखन,शाहिरी परिषदेतून प्रेरणा दिली.शाहिरी परंपरा शिवकार्याशी पुन्हा जोडण्याचे काम त्यांनी केले.त्यांनी इतिहास संकलन समितीद्वारे हरवलेला इतिहास शोधण्याचे मोठे काम त्यांनी केले.

Img 20201028 wa0145

प्रांत प्रचारक ते संघकार्याचे अध्वर्यू असा पिंगळे यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे.रामजन्मभूमी आंदोलन,सरस्वती नदी शोध यात्रा  या कार्यांना त्यांनी प्रेरणा दिली.चार युगात भारत कसा होता याचा नकाशा त्यांनी तयार करवून घेतला. जनता सहकारी  बँकेची स्थापना त्यांनी केली.राम मंदिराचे पुनर्निर्माण म्हणजे राष्ट्र मंदिराची पुनर्निर्मिती आहे,हा विचार त्यामागे होता.या आंदोलनामुळे देशातील भाषा,प्रांत,जात भेद विसरून सर्व एकत्र आले. 

देशभरातील चांगल्या गो-वंशाच्या अभ्यास करण्याची प्रेरणा मोरोपंत पिंगळे यांनी दिली.गो-संगोपनातून ग्रामविकास आणि जैविक शेतीला त्यांनी प्रेरणा दिली.१५० गोशाला स्थापन केल्या.मोरोपंत पिंगळे यांचे जीवनकार्य राष्ट्र कार्यासाठी प्रेरणादायी आहे. 
यावेळी गो- विज्ञान संशोधन संस्था, पुणे चे अध्यक्ष राजेंद्र लुंकड,कार्यवाह बापू कुलकर्णी,चिंतामणी चितळे,रामदास चौंडे,शिरीष भेडसगावकर, इत्यादी उपस्थित होते. 

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये