महाराष्ट्र
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर सकाळी मॉर्निंग वॉक ला गेल्यानंतर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले असून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देशपांडे हे सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक ला गेले असता त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी स्टॅम्प ने मारहाण केली. देशपांडे यांनी बचाव केला पण त्यांच्या पायाला मार लागला असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या देशपांडे यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लेखोरांचा त्यांच्या डोक्यावर व पायावर हल्ला केला मात्र देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केल्याने त्याच्या पायाला मार लागला आहे.




