महाराष्ट्र

राज्यात NIA ची मोठी कारवाई! १० दहशतवादी ताब्यात; चौकशीत धक्कादायक माहिती उघड

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात मोठी कारवाई केली आहे. आज (शनिवार, ९ डिसेंबर) एनआयएने राज्यातील विविध शहरांमध्ये पहाटेपासून मोठ्या कारवाया केल्या असून १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे.ठाण्याजवळील पडगा,पुणे आणि इतर ठिकाणी एनआयए आणि एटीएसची छापेमारी सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी( ९ डिसेंबर) राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) राज्यात संयुक्तपणे कारवाई करत १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. आज पहाटेपासून ही कारवाई सुरू होती.

Img 20231109 wa00224472945685943196081

भिवंडीच्या पडघा गावात एनआयएने ही मोठी कारवाई करत महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने ७ ते ८ लोकांना ताब्यात घेतले आहे. पुण्यामधून दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होतं. तसेच पुणे आणि इतर ठिकाणीही सुरक्षा यंत्रणांची छापेमारी सुरू आहे.

Img 20221228 wa0001281293906176097910423568496031457580102742

धक्कादायक बाब म्हणजे पकडलेले दहशतवादी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब बाल्स्टचे साहित्यही राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने जप्त केले आहे.

दरम्यान, याआधी पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना करण्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Img 20230511 wa0002282292722773256594657904

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये