पुणे शहर

‘अंकुर प्रतिष्ठानचा ‘ कोरोनाकाळातील दिवाळीत सामाजिक संस्थांना आधार

पुणे : देणे समाजाचे समाजासाठी या उपक्रमातून सतत 12 वर्ष अंकुर प्रतिष्ठान नागरिकांना आवाहन करीत आहे, की आपल्याकडच्या जुन्या वापरण्या योग्य वस्तू आमच्या संस्थेला द्या,  त्या आम्ही सामाजिक संस्थांना मोफत देऊन त्यांची गरज भागवू, या परंपरेनुसार अंकुर प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीमध्ये सामाजिक संस्थांना आधार दिला.

संस्थेच्या माध्यमातून दिवाळीच्या आधी 10 दिवस असे आवाहन करून वस्तू स्विकारल्या जातात. सातत्याने गेली 12 वर्ष हा उपक्रम चालू आहे त्यामुळे नागरिकांबरोबर एक विश्वासाचे नाते जोडले गेले आहे. त्यामुळे सुमारे तीन लाखाहून अधिक विविध प्रकारच्या वस्तू येत असतात, ज्यात फ्रिज, वॉशिंग मशीन, कॉम्पुटर, लॅपटॉप, म्युझिक सिस्टिम,भांडी, काचेची भांडी, खेळणी, पुस्तके, फर्निचर, कपडे अशा वस्तू मोठ्या प्रमाणात येतात.

Img 20201114 wa0195

यावर्षी या वस्तूंचे वितरण कर्वेनगर येथे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आणि कर्वेनगर येथील रा स्व संघाचे संघचालक उल्हास जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौरांनी उपक्रमाचे कौतुक केले आणि कोरोना काळातही सातत्याने हा उपक्रम चालू ठेवला आणि अनेक संस्थांना यामुळे मदत झाली जी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक आवश्यक होती व अशा प्रकारचे काम समाजात असले पाहिजे असे सांगितले आणि पुढील वर्षीपासून अंकुर प्रतिष्ठान तर्फे हा उपक्रम माझ्या ऑफिस वर नक्की चालू करणार असे जाहीर केले.

उल्हास जोशी यांनी उपक्रमाचे कौतुक करत असतानाचा ते स्वत: ह्या उपक्रमात गेली अनेक वर्ष सहभागी होत आहेत व हा उपक्रम सामाजिक भान जपण्याबरोबरचं अतीव समाधान देणारा उपक्रम आहे असे सांगितले. या उपक्रमाबाबत त्यांचे अनुभव ही कथन केले

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

संस्थेचे अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांनी सांगितले की अनेकांना समाजात मदत करायची असते परंतु ती आर्थिकच असली पाहिजे असे नाही, आपण छोट्या वस्तू स्वरूपात देखील ती करू शकतो आणि त्याचा फायदा संस्थांना होतो.

प्रभाग समिती स्विकृत सदस्या अॅड मीताली सावळेकर यांनी सांगितले की एका छोट्या सेफ्टीपिन पासून आपण काहीही वस्तू देऊ शकता कारण ग्रामीण भागातील अश्या अनेक संस्था आहेत. ज्यांना मदत मिळणे अवघड असते .तिथे आपण ही मदत पोचवतो.

या उपक्रमात  खोपोली येथील सर्वोदय, मुळशी येथील आदिवासी भागात काम करणारी डोनेट-एड, शिरूर जवळील सेवादीप, बीड येथील Hiv मुलांमध्ये काम करणारी इंफॅन्ट इंडिया तसेच बार्शी, सोलापूर, हेमलकसा, शिवणे, पुण्यातील गुरुवारपेठ येथील संस्थांना ही मदत दिली गेली.

Img 20201118 wa0057

या कार्यक्रमा साठी अॅड प्राची विश्वनाथ बगाटे, रमेश  चव्हाण, समीर ताडे, जगदीश डिंगरे, प्रदीप जोशी, श्रीपाद गोहाड, संजय वरपे प्रशांत बनकर, अतुल गळंगे, अनिका पाठक, श्री व सौ बिडकर, सरोज जोशी, सुनीती जोशी हे उपस्थित होते. प्रास्ताविक कुलदीप सावळेकर यांनी केले आणि आभार स्विकृत सदस्या अॅड मीताली सावळेकर यांनी मानले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये