पुणे शहर

वारजे भागात बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : वारजे भागात खासगी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गजेंद्र श्रीधर घोळवे (वय ३८, रा. श्री शारदा निवास,आय.आय.टी रस्ता, खडकवासला) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी खासगी बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोळवे यांचे भाऊ राजेंद्र (वय ३६, रा. आंबेगाव खुर्द) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Img 20220708 wa00011330202002021897215

दुचाकीस्वार गजेंद्र घोळवे रात्री दहाच्या सुमारास वारजे परिसरातून जात होते. त्या वेळी हाॅटेल पुणेरीसमोर भरधाव खासगी बसने दुचाकीस्वार घोळवे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या घोळवे यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर पसार झालेल्या बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये