पुणे शहर

चंद्रकांत पाटील धावले पोलिसांच्या मदतीला…तिसरा डोळा म्हणून कोथरूड मध्ये बसवले सीसीटीव्ही कॅमेरे

पुणे : शहर वाढले की समस्या वाढतात आणि गर्दी वाढली की गुन्हेगारी. वाढलेल्या शहरात किरकोळ गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हानच असते. राज्याच्या अनेक शहरात ही समस्या उद्भवली आहे. पुणे आणि कोथरूड तरी त्याला कसे अपवाद असेल? पण गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील कोथरूड पोलिसांच्या मदतीला धावले आहेत. पाटील यांनी ठीक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

Img 20241020 wa0001435697684176070576

वाढती गुन्हेगारी पोलिसांची मोठी डोकेदुखी आहे. गुन्हा करायचा आणि शेजारच्या राज्यात पळून जायचे हा नवा गुन्हेगारी फंडा आहे. कोणताच पुरावा नसल्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटतात आणि त्यांना जेरबंद करणे पोलिसांना अशक्य होऊन बसते. पण कोथरूडच्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि पोलिसांना सहकार्यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून ठीकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

आता 24 तास कॅमेर्‍यांचे बारीक लक्ष कोथरूडच्या प्रत्येक घडामोडीवर असते. त्यामुळेच पोलिसांना तर मदत झाली आहेच पण त्याशिवाय गुन्हेगारी घटनानाही मोठ्या प्रमाणात पायबंद बसला आहे. सामान्य कोथरूडकर त्यामुळेच निर्धास्तपणे रस्त्यावर वावरतो आहे.

Img 20240404 wa0015281292591121734012341242
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये