पुणे शहर

वाकडेवाडी नवीन पुलासाठी अहवालाचे काम सुरू – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : वाकडेवाडी येथून पुणे-मुंबई रस्त्याकडे जाण्यासाठी नवीन उड्डाणपुलाची उपयुक्तता तपासण्यासाठी प्रशासनाकडून लवकर अहवाल तयार केला जाईल, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

नरवीर तानाजीवाडी, वाकडेवाडी येथे दुचाकी वाहनांकरिता भुयारी मार्ग आहे. या भुयारी मार्गात चारचाकी वाहनांना प्रवेश नसल्यामुळे चारचाकी वाहनांनी शिवाजीनगर पासून पुणे-मुंबई महामार्गावर जायचे असल्यास भोसलेनगर किंवा संचेती हॉस्पिटलकडून जावे लागते. परिणामी पुणे विद्यापीठ रस्त्यावर आणि सिमला ऑफिस परिसरात चारचाकी वाहनांची गर्दी होते. याकरिता वाकडेवाडी येथे उड्डाणपूल बांधणे गरजेचे असून त्यासाठी वीस कोटींची तरतूद महानगरपालिका अंदाजपत्रकात करावी. अशा आशयाचे निवेदन आमदार शिरोळे यांनी दि. १० डिसेंबर, २०२० रोजी महापालिका आयुक्तांना दिले होते.

Img 20210115 wa0107

त्यानुसार महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता इंद्रभान रणदिवे, कनिष्ठ अभियंता श्री. भोसले यांच्या समवेत आज (शुक्रवारी) पाहणी केली. त्यावेळी नवीन उड्डाण पुलाची प्रशासकीय कामांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नागरिकांची गरज लक्षात घेऊन नवीन उड्डाणपुलाच्या कामाला गती यावी, अशी अपेक्षा आमदार शिरोळे यांनी व्यक्त केली.

Img 20201213 wa0074
1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020 scaled

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये