‘एक दिवा कोविड योद्ध्यांच्या समर्पणाचा’ श्रीमान योगी प्रतिष्ठानाचा विशेष उपक्रम.

प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन.
कोथरुड : ‘त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘श्रीमान योगी प्रतिष्ठान’ च्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून कोथरूड येथे दिपोत्सव साजरा केला जातोय, यंदाच्या वर्षीचा दीपोत्सवाचे महत्व अनन्यसाधारण आहे ‘एक दिवा कोविड योद्ध्यांच्या समर्पणाचा’ असा उपक्रम राबवून हा दिपोत्सव समाधान देणारा व विशेष ठरला,’ असल्याचे श्रीमान योगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी नगरसेविका हर्षाली माथवड, अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे, मंजूश्री खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, सरचिटणीस विठ्ठल बराटे, प्रतीक देसरडा, अक्षय वायाळ, प्रभाग अध्यक्ष अमित तोरडमल, दिनेश माथवड, नवनाथ जाधव व श्रीमान योगी प्रतिष्ठान चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी,’ त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अध्यक्ष दुष्यंत मोहोळ व श्रीमान योगी प्रतिष्ठान च्या पदाधिकाऱ्यांनी कोथरूड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला दिव्यांची नयनरम्य सजावट करुन, कोविड योध्द्यांच्या सन्मानार्थ दिपोत्सव साजरा केला, या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले.



दुष्यंत मोहोळ म्हणाले की, ‘ गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या संकटाशी संपूर्ण जग लढा देत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलिस असे अनेक कोविड योद्धे आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. अशा कोरोना योद्धयांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ‘श्रीमान योगी प्रतिष्ठान’ ने त्रिपुरारी पौर्णिमाचे औचित्य साधून कोथरूड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ ‘ एक दिवा कोविड योद्ध्यांच्या समर्पणाचा’ असा उपक्रम राबवून दिपोत्सव साजरा करून कोविड योद्ध्यांचे आभार मानले.’






