राष्ट्रीय

दिल्ली गारठली तापमान १० अंश सेल्सिअस

नवी दिल्ली – राजधानी दिल्ली थंडीने गारठू लागली आहे. दिल्लीमध्ये मंगळवारी पहाटे तापमानात १० अंश सेल्सिअस इतकी घट झाली होती. अजून दोन दिवस हीच स्थिती राहिल्यास थंडीची लाट आल्याचे जाहीर करावे लागेल असे वेधशाळेने म्हटले आहे. गेल्या चार, पाच वर्षापेक्षा यंदा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच दिल्लीत कडाक्याची थंडी आहे.

गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये प्रदुषणाचा कहर झाला होता. आता थंडीने दिल्लीला लपेटून टाकले आहे. उत्तरप्रदेशच्या मैदानी भागात येत्या दोन, तीन दिवसात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही तापमान घटू लागले असून नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात थंडी जाणवू लागेल. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका जाणवेल.

Img 20201024 wa0166 1
Img 20201028 wa0145

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये