उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले पुण्यनगरीतील मानाच्या गणपतींचे दर्शन…
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अजित पवारांच्या हस्ते मंडळांना सन्मानपत्र..
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यनगरीतील मानाच्या गणपती मंडळांसह प्रमुख गणेश मंडळांना भेट देत दर्शन घेतले. यावेळी मंडळांनी अजितदादांचे मोठ्या दिमाखात स्वागत केले. गणेश मंडळांनी गणेशोत्सवाचा माध्यमातून लोकसेवेचा वसा जपला आहे. यावेळी समाजहिताचे काम करणाऱ्या गणेश मंडळांनी केलेल्या सामाजिक कार्याचे आपण ऋण फेडणे गरजेचे आहे त्याच अनुषंगाने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंडळांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानाचा पहिला श्री कसबा गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग येथील श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,लक्ष्मी मार्ग येथील श्री गुरुजी तालीम मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ, केसरीवाडा गणपती, भोलेनाथ मित्र मंडळ या मंडळाच्या गणपतींचे दर्शन घेतले तसेच श्रीगणेशाची आरती केली.
या भेटीप्रसंगी शहराध्यक्ष दीपक मानकर,विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, अभय मांढरे, प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे, माजी नगरसेवक सुभाष जगताप, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राकेश कामठे, महेश हांडे, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, युवती अध्यक्ष पूजा झोळे, डॉ. सुनिता मोरे, हडपसर अध्यक्ष शंतनू जगदाळे, कोथरूड अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, भोलेनाथ मित्र मंडळ अध्यक्ष करण मानकर,कसबा अध्यक्ष अजय दराडे, क्रीडा सेल अध्यक्ष राजेंद्र देशमुख, दिनेश खराडे, बापू डाकले, योगेश वराडे, कार्याध्यक्ष राहुल पायगुडे, संतोष बेंद्रे, गोरखनाथ भिकुले, युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, अशोक जाधव, सत्यम पासलकर, रवींद्र कवडे, शैलेश मानकर, माधवी मोरे,शाहरुख शेख,चेतन मोरे, सुनिता चव्हाण, बायडाबाई पाटील, कविता राक्षे, विक्रम मोरे, अथर्व हनमघर, सुरेखा माळी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.