पुणे शहर

नव्याने समाविष्ट बावधन बुद्रुकसाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याची दिलीप वेडेपाटील यांची मागणी

बावधन :  पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या मौजे बावधन बुद्रुक गावातील मूलभूत सुविधा विकसित करणेसाठी सन २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात तरतूद उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी केली आहे.

या संदर्भातील निवेदन दिलीप वेडेपाटील यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे. पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट मौजे बावधन बुद्रुक हे गाव पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. १०  हद्दीलगत असून या गावाची साधारण ४५ हजार लोकसंख्या आहे. या गावात सोयीसुविधा देणे गरजेचे आहे. बावधन बुद्रुक गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सन २०२१- २२ च्या अंदाजपत्रकात खालीलप्रमाणे तरतूद उपलब्ध करून देण्याची मागणी वेडेपाटील यांनी केली आहे.  

बावधन बुद्रुक परिसरात पाण्याची लाइन टाकणे, नव्याने ड्रेनेज लाइन टाकणे, रस्ते विकसित करणे, प्रकाशव्यवस्था करणे, अॅमिनीटी स्पेसला सीमाभिंती व गेट लावणे अशा कामांसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Img 20201213 wa0074

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये