राष्ट्रीय

भूक लागलेल्या हत्तीने केली ही करामत, व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल

भुकेने व्याकुळ झाल्यानंतर कोण काय करेल सांगता येत नाही. आपणही भूक लागल्यानंतर अस्वस्थ होतो. मग पटकन काही अन्न पदार्थ खाऊन ती भूक शमवण्यासाठी प्रयत्न करतो. जंगलातील वन्य प्राण्यांचे ही तसेच आहे. पण या प्राण्यांना भूक शमवण्यासाठी किती काळ द्यावा लागेल सांगता येत नाही. भूक लागली की वन्य प्राणी ही सैरभैर होतात. hungry elephant

https://twitter.com/bmbalap/status/1327081119964041216?s=09

असाच प्रकार एका जंगलात घडला. जंगलातून गेलेल्या रस्त्यावर एक हत्ती आडवा थांबला. हत्तीला पाहून बस थांबली मग हत्तीने सोंडेने ड्रायव्हरला बाजूला सारून बस मधील केळीचा घड घेण्याचा प्रयत्न केला. हत्तीने केलेला हा प्रकार पाहून ड्रायव्हर व क्लिनर ची चांगलीच तारांबळ झाली. पण हत्तीला भूकच एवढी लागली होती तर मग काय करणार. त्याला विरोध करणं सोपं आहे का?

वन अधिकारी  बालामुरुगन पी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वर हा व्हिडिओ पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे. What to you call this? अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिली आहे.

Img 20201213 wa0074

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये