बचत गटातील महिलांना आवश्यक वस्तूंचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वाटप

कोथरुड : भेलकेनगर मित्र मंडळ (ट्रस्ट) च्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कोथरूड भागातील महिला बचत गटांना आवश्यक वस्तूंचे वाटप भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
भाजपा कोथरूड मतदार संघाचे सरचिटणीस गिरीश गजानन भेलके यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेविका वसंती जाधव, हर्षाली माथवड, छाया मारणे, हर्षदा फरांदे, अनुराधा एडके, अनिता तलाठी, भाजपा कोथरूड मतदार संघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बचत गटांच्या महिलांचे सातत्याने विविध उपक्रम चालू असतात. या उपक्रमातून रोजगार उपलब्ध होऊन महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या बचत गटांना आवश्यक असणाऱ्या वस्तू देण्यात आल्याचे गिरीश भेलके यांनी सांगितले.







