महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी ; उद्धव ठाकरे यांनी केली कारवाई

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवीन घटना घडत असून त्यामुळे राजकीय उलथा पालथ होत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले बंड थांबले असले तरी त्यांची शिवसेनेच्या नेते पदावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.

या संदर्भातले पत्र सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्ष विरोधी कारवाया होत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख म्हणून असलेल्या अधिकाराचा वापर करत मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून काढून टाकत आहे अशा आशयाचे पत्र उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Img 20220702 wa0001

हे पत्र पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीलाही देण्यात आले आहे. राज्यात स्थापन झालेले सरकार हे शिवसेनेचे असल्याचे एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात येत असले तरी या कारवाईमुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनीही अगोदरच हे सरकार शिवसेनेचे नसल्याचे म्हटले आहे. या कारवाईनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार हे आता पहावे लागणार आहे.

Img 20220621 wa00078738131563619319629

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये