
कोथरूड: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात आज “एक सही संतापाची” हा उपक्रम राबविण्यात आला. कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात घेण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांनी सह्या करत राज्यात जे राजकीय वातावरण निर्माण झाले आहे त्याबाबत संताप व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोथरूड गावठाण येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कोथरूडकर नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. महाविद्यालयीन तरुण,तरुणी, सामान्य नागरिक, गृहिणी, जेष्ठ नागरिक, रिक्षावाले, व्यावसायिक आदी लोकं ह्या सुरू असलेल्या राजकारणाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी स्वतः पुढे आल्याचे पाहिला मिळाले.
भविष्यात राज ठाकरे यांनीच महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करावे अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया काही नागरिकांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे, सरचिटणीस किशोर शिंदे, राम बोरकर, शैलेश जोशी, राजेंद्र वेडेपाटील, विराज डाकवे, किरण उभे, संतोष वाघमारे, हर्षद खाडे, चेतन पवार, स्वप्नील कंधारे यांच्यासह कोथरूड विभागातील पदाधिकाऱ्यांनी केले होते.
एक सही संतापाची या उपक्रमाला कोथरूडमध्ये मिळालेला प्रतिसाद पाहता सद्य राजकीय परिस्थितीबाबत नागरिकांच्या मनात प्रचंड रोष असल्याचे दिसून आले. अनेकांनी संतप्त प्रतिक्रया यावेळी व्यक्त करताना राजसाहेब ठाकरे हाच एकमेव पर्याय भविष्यात ठरू शकतो अशा भावना व्यक्त केल्याचे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांनी सांगितले.













