कोथरुड

चांदणी चौक दि. जैन मंदिरात विनयांजली सभेचे आयोजन

कोथरुड : कोथरूड मधील चांदणी चौक येथील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे परमपूज्य गुरूवर आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या समता पूर्ण समाधी निमित्त चांदणी चौक दिगंबर जैन मंदिरात विनयांजली सभेचे आयोजन करण्यात होते.

यावेळी भगवान महावीर यांचे नित्य अभिषेक व शांती धारा झाल्यानंतर  परमपूज्य आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या जीवनातील काही प्रसंग तसेच जैन धर्माचेच नव्हे तर सर्वांचेच आचार्य श्री कसे प्रेरणा स्त्रोत्र होते, त्यांची साधी राहणी, त्याग, तपश्चर्या, लिखाण, याबद्दल अनेकांनी आपले अनुभव कथन केले.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

“मूक-माटी” भाष्यकार  लीलावती जैन यांनी त्यांच्या भेटीचे काही प्रसंग आणि त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करून आचार्यश्रींचे कार्य यापुढेही असंच चालू ठेवणे हीच त्यांना खरी विनायंजली ठरेल. आचार्य श्री आपल्यात नसले तरी ते प्रत्येकाच्या मनात नेहमीच राहतील. त्यांचे उपदेश जगण्याचा मार्ग सांगणारे आहेत.

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192

शेवटी प.पू.विद्यासागरजी महाराजांची आरती करून विनायंजली सभा सांगता करण्यात आली. या वेळी जैन मंदिराचे विश्वस्त दिनेश गणेशवाडे, श्रीकांत पाटील, उदय लेंगडे, महावीर पालगौडर, शिरीष बोरगावे, अशोक मगदूम, सुनील बिरनाळे, प्रीतम मेहता, प्रकाश कुडचे, शोभा पोकळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे दिगंबर जैन समाजातील चांदणी चौक, कोथरुड,  पौड रोड व बावधन परिसरातील दिगंबर जैन बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये