पुणे शहर
पुण्यातील सिंहगड रोडवर गॅसची लाईन फुटली, रस्त्यावर आगीच्या ज्वाळा

पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवरील राजाराम पुलाजवळ MNGLची गॅस पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. ही घटना रात्री 12 वाजण्याच्या घडली. गॅस पाईपलाईन फुटल्यामुळं जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत आहेत. अग्नीशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली आहे.
अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र, पाईपमधून गॅसचा प्रवाह सुरु असल्यानं आग आटोक्यात येत नव्हती. अखेर अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांच्या मदतीने हि आग आटोक्यात आणण्यात आली.या घटनेमुळं सिंहगड रोडवरील या भागातील एका बाजुची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती.




