कोथरुड

कोथरुडमध्ये रस्त्यावर सेलिब्रेशन करताय तर सावधान, या कॅमेराची आहे नजर …

कोथरुड : रस्त्यावर मित्र मैत्रिणींना जमा करून वाढदिवस साजरा करण्याची नवीन पद्धत गेल्या काही वर्षांपासून कोथरुड मध्ये व पुणे शहराच्या इतर भागातही सुरू आहे. कोथरुड भागात रात्री उशीरपर्यंत असे वाढदिवस साजरे केले जात असल्याने त्याचा त्रास होत असल्याचा उल्लेख नागरिकांकडून यापूर्वी अनेकवेळा केला गेला आहे. पण सध्या कोविड बाबत कडक निर्बंध लागू असतानाही अशा पद्धतीने रस्त्यावर वाढदिवस साजरे केले जात आहेत. अशाच एका ग्रुपला कोथरुडमध्ये रस्त्यावर वाढदिवस साजरा करणं महाग पडलं असून त्यांना पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. If you are celebrating on the street in Kothrud, beware, this camera

कोथरूड -बावधन क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणारे मयूर कॉलनी येथे रस्त्यावर एका ग्रूपकडून कोविडचे निर्बंध झुगारून वाढदिवस साजरा केला जात होता. कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांचे समवेत गस्त घालनाऱ्या पथकाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी या सलिब्रेशन चे फोटो काढले, पण सेलिब्रेशन करणाऱ्यांना या अनोळख्या व्यक्तीने काढलेल्या फोटोंचे कौतुक वाटले व त्यांनी पोजेस दिल्या पण इथेच त्यांची फसगत झाली.

Img 20210223 wa0156

ते फोटो काढणारे अनोळखी व्यक्ती महापालिकेचे अधिकारी असल्याचे त्यांच्या नंतर लक्षात आले.

भर रस्त्यावर मुले चार चाकी गाडी वर विना मास्क घालून सार्वजनिक ठिकाणी वाढदिवसाचा केक कापण्याचा कार्यक्रम साजरा करीत असताना वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, आरोग्य निरीक्षक संतोष ताटकर, नवनाथ मोकाशी, सचिन लोहकरे, वैभव घटकांबळे, तसेच सहाय्यक यांनी विना मास्क धारण करणाऱ्या एकूण ७ जणांवर प्रत्यकी ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करत एकूण ३५०० रुपये दंड वसूल केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये