राष्ट्रीय

OBC Reservation :ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी टळली

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षण (OBC Reservation) प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी टळली आहे. महाराष्ट्र सरकार सोमवारी सविस्तर शपथपत्र सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या तीन सदस्यीय खंडीपीठापुढे सुनावणी होणार होती. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू होते का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने केलेल्या नव्या कायद्याला आव्हान दिलं गेलंय. मध्य प्रदेशच्या धर्तीवर आरक्षित प्रभाग आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पर्याय म्हणून हा कायदा आणला आहे, कोर्टात टिकणार की नाही याचा निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच मध्यप्रदेशच्या धर्तीवर आरक्षित प्रभाग आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेण्याचा कायदा केला होता. या कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते आणि त्याची सुनावणी आता लवकरच होणार आहे.

Fb img 1650522168570
Fb img 1650515749051817962385714415660
Img 20220419 wa0007968353280963622575
Img 20220419 wa0026

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये