महाराष्ट्रातील मुलगा तर मुलगी उत्तर भारतीय; सिल्वासा येथे जुळले प्रेम, पण लग्नबेडीत अडकण्याऐवजी अडकले पोलीसांच्या बेडीत

सिल्वासा/वाशीम : कंपनीत असताना महाराष्ट्रातील रिसोडच्या एका मुलाचे बिहारच्या मुलीशी प्रेमसंबध जुळले. आयुष्यभर सोबत राहण्याची स्वप्ने रंगली. परंतु दोघांच्याही जाती आडव्या आल्या. दोघेही पळून रिसोडात रहायला गेले. मात्र, मुलींच्या घरच्यांनी मुलीच्या अपहरणाचा गुन्हा सिल्वासा येथे दाखल केला. पोलीस पथक रिसोडात पोहचले. त्या दोघांचाही शोध घेतला. त्यांना रिसोडच्या पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. मुलगी अल्पवयीन असल्याने लग्नबंधनात अडकण्याऐवजी ते पोलीसांच्या बेडीत अडकले.
रिसोड शहरातील बसस्थानक परिसरातील एक तरुण सिल्वासा येथे मजुरीच्या कामासाठी आला होता. तिथे एका कंपनीत काम करताना तो एका मुलीच्या प्रेमात पडला. दोघांचे प्रेम प्रकरण वर्षभर चांगलेच बहरले. सात जन्माचे वादे करण्यात आले. परंतु धर्म आणि जातीच्या अडथळ्यांमुळे दोघेही लग्न करू शकत नव्हते. यामुळे दोघांनीही घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि डिसेंबर महिन्यात ते प्रेमीयुगुल रिसोडला पोहोचले. तिकडे सिल्वासा येथे मुलीच्या पालकांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली.
तिथे एका कंपनीत काम करताना तो एका मुलीच्या प्रेमात पडला. दोघांचे प्रेम प्रकरण वर्षभर चांगलेच बहरले. सात जन्माचे वादे करण्यात आले. परंतु धर्म आणि जातीच्या अडथळ्यांमुळे दोघेही लग्न करू शकत नव्हते. यामुळे दोघांनीही घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि डिसेंबर महिन्यात ते प्रेमीयुगुल रिसोडला पोहोचले. सिल्वासा येथे मुलीच्या पालकांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली.
सिल्वासा पोलीस १० जानेवारी रोजी रिसोडच्या पोलीस ठाण्यात पोहचले. रिसोड पोलिसांच्या मदतीने त्यांनी दिवसभर त्या प्रेमीयुगुलाचा शोध घेतला. दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आवश्यक ती सर्व कारवाई करून सिल्वासा पोलीस रात्री उशिरा प्रेमी युगुलासह त्यांना घेऊन गेले. मुलीने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तिचे वय १८ वर्षाचे होते. परंतु सिल्वासा पोलिसांकडे असलेल्या कागदपत्रावर ती अल्पवयीन असल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे.




