मोदी पोहचले थेट लालकृष्ण अडवाणींच्या घरी

लालकृष्ण अडवाणी यांचा ९३ वा वाढदिवस
नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा ९३ वा वाढदिवस रविवारी साजरा होत आहे. अडवाणी यांनी सकाळी ट्विट केले असून त्यात ‘श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम’ अशी राम स्तुती उधृत केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आदी नेत्यांनी अडवाणींच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. देशासाठी तुम्ही अथक परिश्रम करीत आहात, देशसेवेचे हे कार्य असेच चालू ठेवा असे आशीर्वाद अडवाणीजींनी पंतप्रधान मोदी यांना दिले.
देशाची मान जगात उंचावेल असे काम आपण नीश्चितच कराल असा विश्वास अमित शहा यांच्या भेटीनंतर केलेल्या ट्विट मध्ये अडवाणीजींनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी अडवाणीजींना शुभेच्छा देऊन त्यांना आयु, आरोग्य लाभावे अशी प्रार्थना केली आहे.







