पुणे शहर

कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण

पुणे : कोथरुडकरांसाठी आज सोन्याचा दिवस आहे. कारण वर्षोनुवर्षे कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा ही कोथरुडकरांची इच्छा आज पूर्ण होत आहे. नळस्टॉप (अभिनव चौक) येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी दुहेरी उड्डाणपुलाचे लोकार्पण भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्यासोबत ई-बाईकने प्रवासही केला.‌ यावेळी भाजपाचे कोथरुड मधील नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. कोथरूडभागातून पुणे शहरात जाताना कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप चौकाचा वापर कोथरूडकर नागरीकांना करावा लागतो. या चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून दुहेरी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे मेट्रो रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतूक या दुहेरी उड्डाणपुलावरून सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षे कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकामध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे.आज या चौकातील पुल वाहतुकीसाठी खुला झाल्याने नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

Img 20220313 wa00121758287814268207858
Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये