कोथरुड

श्रीराम मंदिर निर्माण सोहळ्या निमित्त कोथरूडमध्ये श्री तुळजाभवानी माता व राधाकृष्ण सेवा संस्थेच्या वतीने धार्मिक विधी

कोथरूड : अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्र मंदिर निर्माण निमित्त कोथरूड येथे श्री तुळजाभवानी माता व राधाकृष्ण सेवा संस्थेच्या वतीने धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले. होमहवन, श्रीराम रक्षा पठण, मानवंदना महाआरती व महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे यावेळी घेण्यात आले.

प्रबोधन वाद्यपथकाच्या वतीने प्रभु श्रीरामांना ढोलताशा व ध्वजपथकाच्या गजरात मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रभु श्रीरामांचे विधिवत पुजन करून अवघा परिसर राममय झाला. नागरिकांनी देखील उत्स्फूर्त सहभागी होत श्रीराम पूजेत सहभाग घेतला.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शुक्राचार्य वांजळे, माजी नगरसेवक योगेश मोकाटे, नवनाथ जाधव, पुनीत जोशी, प्रमोद देशमुख, शिरीष राणे, शिवाजी गाढवे, शंकर मोकाटे, अशोक बोराटे, बाळासाहेब मोकाटे, यशवंत बुचके, बुवासाहेब भेलके, संदिप बुटाला, नाना कुंबरे, विजय मोकाटे, मोरेश्वर गायकवाड, राजू मोकाटे, महेश सुतार, शंतनु लिंगे, मयुर भुजबळ, स्वप्नील राजीवडे, छाया भोसले, सविता वायकर, तसेच कोथरुड भागातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Img 20231112 wa00053541767882370111537

मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर या ठिकाणी प्रभू श्रीरामांची महाआरती पार पडली व हजारो रामभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. नागरिकांची प्रचंड गर्दी यावेळी जय श्रीरामचा नारा देत आनंदोत्सव साजरा करताना दिसत होती.
माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सर्व रामभक्तांना यावेळी शुभेच्छा दिल्या.

Img 20230511 wa0002282292969174931887579613
Img 20240120 wa00096813043095854158068
Img 20240121 wa00382598004317740425806
Img 20240121 wa00112357920439439015160
Img 20240121 wa00172482721898892502285
Img 20240121 wa00095487398556080398780
Img 20240121 wa00133842424488050594969
Img 20240121 wa00065252206207234881050
Img 20240120 wa00572661306229998441106
Img 20240120 1411245335154334332732265
Fb img 17058116689734456722729440444596

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये