नॉन कोविड रुग्णांना रुग्णालयांनी उपचार नाकारु नयेत.

मुंबई : कोरोनाच्या संसर्गामुळे इतर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास रुग्णालयांकडून नकार देण्यात येत असल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. अशा प्रकारामुळे काही रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी
कोविड रुग्ण तसेच नॉन कोविड रुग्णांनाही उपचार मिळणे आवश्यक आहे. नॉन कोविड रुग्णांना कोणत्याही रुग्णालयांनी उपचार नाकारु नयेत .रुग्णालयांनी आवश्यक ती काळजी घेऊन तात्काळ उपचार करण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी रुग्णालयांना दिल्या आहेत.
मागील पाच महिन्यांपासून कोरोना संसर्गाचा वाढलेल्या प्रभावामुळे इतर आजार असलेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा या रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करून घेतले जात नाही. दाखल करायच असल्यास कोविड चाचणी करणे बंधनकारक केले आहे. कोविड आजरा व्यतिरिक्त दुसऱ्या आजाराने गंभीर असलेला रुग्ण रुग्णालयात गेल्यावर त्याच्यावर वेळेवर उपचार होत नसल्याने ते दगावला गेले असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे इतर रुग्णांची एकूणच हेळसांड होताना दिसत आहे.
याबाबत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही नॉन कोविड रुग्णांनाही अत्यावश्यक सेवा मिळाली पाहिजे याबाबतचे पत्र आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिले होते. राज्यातील बहुतांशी खाजगी रुग्णालये इतर आजार असलेल्या रुग्णाला कोविड १९ चा रिपोर्ट असल्याशिवाय दाखल करून घेत नाहीत. त्यामुळे याचा फार मोठा फटाका इतर रुग्णांना बसत आहे. गंभीर स्वरूपाच्या नॉन कोविड रुग्णांना कोविड टेस्ट करेपर्यंत वेळ जातो आशात गंभीर रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या नॉन कोविड रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेताना कोविड टेस्ट ची अट ठेवू नये. अगदीच गरज असेल तर रुग्णालयांनीच रुग्णाची कमी कालावधीत होणारी अँटिजन टेस्ट करून त्याच्यावर तातडीने उपचार करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात अशी मागणी चाकणकर यांनी केली होती.
आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आदेशानुसार खाजगी रुग्णालये नॉन कोविड रुग्णांनवर उपचार करणार का? हे पहावे लागणार आहे.



