एवढी वर्ष सत्ता पण वारजे माळवाडी, नवीन अहिरे, रामनगर मधील मूलभूत प्रश्न अजूनही तसेच..परिस्थिती बदलण्यासाठी मनसे हाच पर्याय : भाग्यश्री दांगट

पुणे : महापालिकेत येऊन एवढा काळ लोटला तरी वारजे माळवाडी रामनगर, नवीन अहिरे परिसरातील मूलभूत नागरी प्रश्न अजून तसेच आहेत. आज या भागात गेले की रस्त्यावरून वाहणारं ड्रेनेजचे पाणी, रस्त्यावर खड्डे असे चित्र पाहायला मिळते. सत्तेमधील पदं वारजेला मिळूनही त्यात काही बदल झाला नाही, त्यामुळे ही परिस्थिती बदलण्याची शिवणे वारजेकरांनी आता परिवर्तनासाठी पुढे यावे असे आवाहन प्रभाग क्रमांक ३२ वारजे, पॉप्युलरनगर मधील मनसेच्या उमेदवार भाग्यश्री दांगट यांनी केले.
प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर मनसेच्या चारही उमेदवारांनी प्रभागात प्रचाराचा धडाका सुरु केला असून वारजे शिवणे परिसरातील समस्यांकडे ते नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मनसेच्या उमेदवार भाग्यश्री कैलास दांगट, केशर प्रवीण सोनवणे, गणेश धुमाळ, रियाज शेख यांना प्रचार दौऱ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रामनगर, नवीन अहिरे मध्ये झालेल्या प्रचार रॅलीत भाग्यश्री दांगट यांनी नागरिकांशी संपर्क साधताना वारजे, शिवणे परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, वर्षांवर्षापासून तशाच राहिलेल्या समस्या सोडवण्यासाठी मनसेच्या उमेदवारांचा विचार करावा असे आवाहन केले. केवळ निवडणुका आल्या की नागरिकांपुढे जायचे आणि निवडून आले की त्यांच्याकडे डुंकूनही नाही पाहिचं ही वृत्ती नागरिकांनी ओळखली असून यावेळी मनसेचा सक्षम पर्याय मतदार निवडतील असा विश्वास भाग्यश्री दांगट यांनी व्यक्त केला आहे.




