Share Market Updates : शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला

मुंबई : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर 600 अंकानी सेन्सेक्स घसरला. अमेरिकन शेअर बाजारातही घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. शेअरबाजारावर यावेळी अनेक घटकांचा दबाव वाढला आहे. LIC IPO पूर्वीच विक्रीचा दणका सुरु आहे. अनेकांना या आयपीओतमध्ये नशीब आजमावयाचे आहे. याव्यतिरिक्त अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेकडेही बाजाराचे लक्ष्य लागले आहे.
बाजारातील विश्लेषकांच्या मते, गुंतवणुकदारांनी एलआयसी आयपीओत (LIC IPO) गुंतवणूक करता यावी यासाठी मोठ्या प्रमाणात विक्रीचा दणका सुरु केला आहे. अमेरिकन शेअर बाजारात ही मोठ्या प्रमाणात विक्री नोंदवण्यात आली. नॅसडॅक मध्ये 4.17 टक्के तर एसपी 500 मध्ये 3.63 टक्क्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात बाजारात घसरण दिसून आली. त्यामुळे बाजाराने नकारात्मक दिशेने प्रवास केल्याचे समोर आले.
शेअर बाजार सुरू झाला तेव्हा एक टक्क्यांहून अधिक घसरण सेन्सेक्समध्ये झाली. निफ्टीमध्ये 178 अंकाची घसरण दिसून आली. निफ्टी निर्देशांक 16,924.45 अंकावर सुरू झाला. तर, सेन्सेक्स 56,429.45 अंकावर सुरू झाला. निफ्टीमधील 50 पैकी 4 शेअर्स वधारले. तर, 46 शेअरमध्ये घसरण दिसून आली. बँक निफ्टीमध्ये 115 अंकानी घसरत 35973 अंकावर व्यवहार करत होता. बँक निफ्टी निर्देशांक 36000 अंकाखाली घसरला आहे. प्री-ओपनिंग सत्रात घसरलेला सेन्सेक्स सकाळी 9.30 वाजल्यानंतर काही प्रमाणात सावरला असल्याचे चित्र होते. मात्र, बाजारात विक्रीचा दबाब असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
HDFC आणि ब्रिटानिया कंपनींचा कारभाराचा लेखाजोखा समोर येणार आहे.वाहन ७ेत्रातील कंपन्यांनी एप्रिल महिन्यातं जोरदार प्रदर्शन केले आहे. अशोक लेलँडच्या विक्रीत 42 टक्के वृद्धी झाली आहे. तर मारुतीच्या विक्रीत किंचित घसरण दिसून आली. टाटा मोटर्सच्या विक्रीत 74 टक्क्यांची वाढ झाली आहे.




