पुणे शहर

शाळांना शिवचरित्र भेट देत कर्वेनगरमधील मोरया मित्र मंडळाकडून शिवजयंती साजरी..

कर्वेनगर : मोरया मित्र मंडळ कर्वेनगर पुणे यांच्या वतीने  कोथरूड, कर्वेनगर भागातील पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, आणि कर्वेनगर ते डेक्कन भागामधील सर्व शाळांमध्ये जाऊन  छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि शिवसूत्र यशस्वी जीवनाचा महामंत्र हे शिवचरित्र भेट देत अभिनव पद्धतीने शिवजयंती साजरी केली.

मंडळाचे संस्थापक केदार मारणे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जंयती नाचुन नाही वाचुन साजरी करायची हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. मारणे म्हणाले मोरया मित्र मंडळ सतत सामाजिक उपक्रम राबवत असते. गेल्या ४ वर्षापासून शिवाजी महाराज जयंती नाचून नाही वाचुन साजरी करावी ही संकल्पना आम्ही राबवत आहोत. शिवाजी म्हणजे
शि म्हणजे शिका
वा म्हणजे वाचा
जी म्हणजे जिंका
म्हणून शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिवाजी महाराज कळावे म्हणून आम्ही ही पुस्तके त्याच्या पर्यंत पोहचवत आहोत. आम्हाला शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या विचारांची पिढी निर्माण करायची आहे. त्यांच्यावर तसे संस्कार व्हावेत म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहे. शिवचरित्र हे प्रेरणादायी आहे. भविष्यात विद्यार्थी शिवचरित्राचं वाचणं केल्यानंतर जग जिंकल्या शिवाय राहणार नाहीत. हे शिवचरित्र वाटपाचा शुभारंभ माजी नगरसेविका जयश्री मारणे आणि भारतीय इतिहास संशोधक मंडळ सभासद मंगेश नवघणे यांच्या हस्ते  करण्यात आला.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

यावेळी साह्यक आयुक्त वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय विजय नायकल, मंडळाचे अध्यक्ष रोहिदास जाधव, स्वाती दारवटकर, पौर्णिमा केसवड, अनिल आठवले,अथर्व भरम, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांना हा उपक्रम खूप आवडला असून मोरया मित्र मंडळाच्या वतीने स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असेच उपक्रम भविष्यात सर्व मंडळांनी राबविले पाहिजेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192
Img 20240202 wa00026664518766032457834

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये