कोथरुड मध्ये शिवसैनिकांनी पेटवली क्रांतीची मशाल..

कोथरुड मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोथरुड मधील कर्वे पुतळा चौकात मशाल पेटवून शिवसैनिकांनी जल्लोष केला.
यावेळी पुणे महापालिकेतील माजी गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, शहरप्रमुख गजानन थरकुडे, माजी नगरसेवक योगेश मोकाटे, उमेश भेलके, राजेश पळसकर, भारत सुतार, किशोर सोनार, नितीन शिंदे, गणेश काकडे, नागेश गायकवाड, छाया भोसले व कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मशाल प्रज्वलीत करून कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला.
यावेळी बोलताना पृथ्वीराज सुतार म्हणाले, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या नावात आमचे दैवत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे या दोघांची नावे असून क्रांती घडवणारे मशाल चिन्ह नवी क्रांती घडवणार आहे. एक प्रकारे अन्याय् दूर करण्यासाठीच हे चिन्ह मिळाले आहे. नव्या क्रांतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

गजानन थरकुडे म्हणाले, ज्या प्रमाणे धनुष्यबाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते त्या प्रमाणे काल एका दिवसात मशाल चिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि मनात पोहचले आहे. ही क्रांतीची मशाल आहे आणि क्रांती काय असते हे येणाऱ्या निवडणुकीत मिंद्ये गटाला कळेल.
उमेश भेलके म्हणाले, आता क्रांतीची मशाल पेटली आहे आणि ती विरोधकांना संपवणार हे निश्चित आहे. काल चिन्ह मिळताच ते महाराष्ट्रातील प्रत्येक माणसापर्यंत पोहचले आहे. ही मशाल हातात घेऊन क्रांतीला सुरवात झाली आहे.


