पुणे शहर

महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे, रविंद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

पुणे : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असुन माझ्यावर प्रेम करणाऱ्या पुणेकर जनतेच्या आशीर्वादासह महाविकास आघाडीतील सर्व नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला. अशी प्रतिक्रीया पुणे लोकसभा मतदारसंघांतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केली 

धंगेकर म्हणाले,गेल्या ३० वर्षाच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत पुणेकरांनी माझ्यावरती दाखविलेला विश्वास आणि काम करण्याची दिलेली संधी, प्रेम आणि आशीर्वादाने येणाऱ्या काळात लोकसभेच्या माध्यमातून काम करण्याची संधी पुणेकर मायबाप जनता मला देईल, अशी खात्री आहे. 

Img 20240404 wa00195661228638643442239

धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार व बारामती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार सचिन अहिर, माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम, खासदार व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे,संजय जगताप, आमदार अशोक पवार, माजी आमदार जयदेव गायकवाड, युगेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, दाैंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले यांच्यासह महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Img 20240404 wa00142311409567432001146
Img 20240404 wa00154462680026350583661

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये