पुणे शहर

अमोल बालवडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत वृत्तपत्र विकेत्याच्या कुटुंबीयांना केली एक लाखाची आर्थिक मदत

पुणे : बाणेर-बालेवाडी येथील वर्तमानपत्र विक्रेता कै.महेश चौधरी यांच्या ४ महिन्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी कर्तव्य म्हणून अमोल बालवडकर फाऊंडेशन तर्फे सामाजिक बांधिलकी जपून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज कै. महेश यांचा मुलगा चि. सर्वज्ञ याच्या नावाने १ लक्ष रुपयांची FD करून त्यांच्या पत्नीला हस्तांतरित केली.

आपण ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करतो त्यातील प्रत्येक घटकापर्यंत आपले सहकार्य पोहोचले पाहिजे, त्यांच्या सुखदुःखात सामील झाले पाहिजे अशी शिकवण नेहेमीच आमचे नेते महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील हे आम्हा सर्वांना देत असतात.. दादांच्या माध्यमातून ही कोथरुड विधानसभा मतदारसंघातील अनेक गरजूंना अनेक प्रकारे मदत मिळत असते..

Img 20220610 wa00017276715392653490645

याच विचारांची कास धरून चंद्रकांत दादांच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स, जाहिरात खर्च टाळून खऱ्या अर्थाने सामाजिक काम करण्याचा निर्णय अमोल बालवडकर फाऊंडेशन ने घेतला आहे..

बाणेर बालेवाडी येथील वर्तमान पत्र विक्रेता महेश वसंत चौधरी(वय ३२) यांचे काही दिवसांपूर्वी अल्पवयात हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, कै. महेश हे अतिशय कष्टाने आणि जिद्दीने आपल्या परिवाराची उपजीविका भागवण्यासाठी वर्तमान पत्र विक्रीचा व्यवसाय करत होते..

Img 20220609 wa00146435178914062122879

घरातील कर्ता माणूस गेल्याने त्यांच्या पश्चात कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला म्हणुन सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अमोल बालवडकर फाऊंडेशन कडुन कै. महेश यांचा मुलगा चि. सर्वज्ञ याच्या नावाने १ लक्ष रुपयांची FD करून त्यांच्या पत्नीला हस्तांतरित केली, तसेच सर्वज्ञ याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी अमोल बालवडकर फाऊंडेशनने घेतली आहे.

या प्रसंगी शशिकांत बालवडकर, प्रवीण बालवडकर, रोनक गोटे, सुमित कांबळे, बाबुराव गीते व अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते.

Img 20220609 wa00164383435053372771588
Img 20220608 wa00062205358887987412776
Img 20220610 wa0000507258318610830201

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये