वारजे माळवाडी परिसरात पदयात्रा काढत सुप्रिया सुळेंनी साधला मतदारांशी संपर्क

वारजे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी खडकवासला मतदार संघातील वारजे माळवाडी परिसरात पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सचिन बराटे, विजय खळदकर, स्वप्नील दुधाने, प्रमोद शिंदे, किशोर कांबळे, बाबू दोडके, दत्ता झंजे, निलेश वांजळे, अजय भुवड, मयूर वांजळे, व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

वारजे माळवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुळे यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली. पी.एम टी कॉलनी, गिरीश सोसायटी, समर्थ सोसायटी, नादब्रह्म, राजयोग, पॉप्युलरनगर, माळवाडी परिसरातून ही पदयात्रा पार पडली.
बारामती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यातील लढत रंगतदार होणार असून दोन्ही उमेदवारांनी खडकवासला मतदार संघात विशेष लक्ष घातलेले आहे. त्यामुळे या भागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.









