मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी लुपिनकडून “अॅप्टिव्हेट चॅम्पियन रन फॉर किड्स”ची घोषणा

मुंबई : लुपिन लिमिटेडच्या ग्राहक आरोग्य सेवा विभाग लुपिन लाइफ च्या वतीने दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी MMRDA ग्राउंड्स, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे पहिल्या-वहिल्या ‘अॅप्टिव्हेट चॅम्पियन रन फॉर किड्स’ची घोषणा करण्यात आली आहे .
अॅप्टिव्हेट चॅम्पियन रन फॉर किड्सचा उद्देश मातांना त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी चांगली भूक आणि शारीरिक हालचालींद्वारे प्रोत्साहन देण्यासाठी आहे. अॅप्टिव्हेट चॅम्पियन रन फॉर किड्स मुलांसाठी धावण्याच्या तीन श्रेणीमध्ये आहे. ज्यात ४-७ वर्षांच्या मुलांसाठी ५०० मीटर धावणे स्पर्धा असून शक्यतो ती त्यांच्या पालकांसह असेल, तसेच ८-१० वर्षांच्या मुलांसाठी १.५ किमी धावणे आणि ११-१३ वर्षांच्या मुलांसाठी २.५ किमी धावणे स्पर्धा आहे.
कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी, सर्व सहभागींना त्यांच्या
कर्तृत्वाचे प्रतीक म्हणून प्रमाणपत्र आणि पदके दिली जातील. या रननंतर इव्हेंट साजरा करण्यासाठी ट्रॅम्पोलिन, बाउंसी कैसल्स, टॉय ट्रेन्स, झुंबा सेशन्स आणि बरेच काही यासारखे इतर उपक्रम असतील. प्रसिध्द अभिनेत्री नेहा धुपिया अधिकृत पणे या कार्यक्रमाचा शुभारंभ करतील आणि विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करतील.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाद्वारे, लुपिन लाइफ मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील मुलांना अॅप्टिव्हेट चॅम्पियन रनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. लुपिनचे अॅप्टिव्हेट सिरप मुलांना नैसर्गिकरित्या त्यांची भूक वाढवून त्यांचे आरोग्य सुदृढ करण्यास मदत करते. आवळा, गुळवेल आणि पिंपळी यांसारख्या १००% आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले हे फॉर्म्युलेशन रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि नैसर्गिकरित्या मुलांमध्ये ऊर्जा वाढवते.
या घोषणेवर बोलताना,इंडिया रिजनल फॉर्म्युलेशन, लुपिन चे अध्यक्ष राजीव सिब्बल म्हणाले, अॅप्टिव्हेट चॅम्पियन रन फॉर किड्स ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून मुलांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी आमच्या वचनबद्धतेचा उत्सव आहे. या धावण्याच्या माध्यमातून, आम्हाला आशा आहे की, मुलांना निरोगी जीवन जगण्यासाठी आणि धावण्याच्या आनंदातून त्यांची प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी प्रेरणा मिळेल. आम्ही पालकांना त्यांच्या मुलांना या मजेदार आणि अर्थपूर्ण कार्यक्रमात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो आणि आमच्या ध्येयासाठी त्यांचा पाठिंबा मागतो.




