पुणे शहर

पुणे रेल्वे स्टेशनवर संशयितरित्या फिरणाऱ्या गुजरातमधील व्यक्तीला अटक, पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त

पुणे : रेल्वे स्थानकावर अवैधरित्या पिस्तूल आणि काडतुसे बाळगल्याप्रकरणी पुणे रेल्वे पोलिसांनी मंगळवारी गुजरातमधील एका व्यावसायिकाला अटक केली आहे. या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद जाणवल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं. चौकशी करुन झडती घेतली असता त्याच्याकडून परदेशी बनावटीचं पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे यांच्यासह जवळपास साडेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अनिलकुमार रामयज्ञ उपाध्याय (वय 47 वर्षे, रा. रामेश्वर रेसिडेन्सी, सुरत) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी व्यावसायिक सुरतवरुन बंदूक घेऊन महाराष्ट्रात आला होता. या व्यावसायिकाने बेकायदेशीरपणे पिस्तूल का बाळगलं होतं, याचा तपास सध्या सुरु आहे.

Img 20230126 wa00008877313132605679443

या प्रकरणी पोलीस हवालदार निशिकांत राऊत यांच्या तक्रारीनंतर पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीकडे विनापरवाना पिस्तूल होती. कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आम्ही अधिक तपास करत आहोत, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

एफआयआरमधील माहितीनुसार, निशिकांत राऊत आणि रेल्वे पोलिसांतील इतर कर्मचारी मंगळवारी (24 जानेवारी) पुणे रेल्वे स्थानकावर ड्युटी करत होते. सकाळी 10.55 च्या सुमारास त्यांना रेल्वे स्थानकाच्या मुख्य गेटजवळ एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसली. त्यांनी त्या व्यक्तीला अडवलं आणि त्याची चौकशी केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, एक टॅब, तीन मोबाईल आणि काही सोन्याचे मौल्यवान साहित्य पोलिसांना सापडले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये