मुलायम सिंह यादव यांचे निधन

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे वयाच्या 82 या वर्षी निधन झाले आहे. गुरुग्राम मधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या अनेक दिवस त्यांची प्रकृती गंभीर होती. आज अखेर त्यांनी उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला.
उत्तर प्रदेश मधील राजकारणावर त्यांचा कायम प्रभाव राहिला असल्यामुळे त्यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेश मधील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

1967 मध्ये ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आमदार झाले, तर 1992 साली त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. तीन वेळा त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद भूषवलं. 1996 ते 98 दरम्यान त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली तर मागील लोकसभा निवडणुकीत ते उत्तर प्रदेशच्या मेनूपुरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.






