कडाक्याच्या थंडीमुळे शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी..

पुणे : सध्या पुण्यासह राज्यात कडाक्याच्या थंडी पडली असून आलेल्या या थंडीच्या लाटेमुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. विद्यार्थींच्या आरोग्यासाठी व सुरक्षितेसाठी शाळेच्या वेळेमध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे.
या संदर्भातील निवेदन शिक्षण आयुक्त यांना देण्यात आले आहे . याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिष्टमंडळाकडून राज्य प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया, राज्य सचिव आशिष साबळे , राज्य उपाध्यक्ष ॲड सचिन पवार, हेमंत डांगे , राज्य कार्यकारिणी सदस्य रुपेश घोलप, सारंग सराफ,अभिषेक थिटे, रवि बनसोडे,शैलेश विटकर ,
पुणे शहराध्यक्ष अमोल शिंदे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अनिकेत प्रभु व मनविसे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात कडाक्यात थंडीमुळे सकाळी लवकर शाळा असल्यामुळे विद्यार्थींच्या आरोग्यचे प्रश्न उपस्थित होत आहेत. भारतातील अनेक राज्यात कडाक्याच्या थंडीमुळे शाळेच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. नुकतेच हवामान खात्याने महाराष्ट्रातील थंडी अजून वाढणार आहे असे ही जाहीर केले आहे.

बदलत्या हवामाना मुळे अनेक विद्यार्थी आजारी पडत आहेत. खबरदारी म्हणून महाराष्ट्रात ही सर्व शाळांच्या वेळेमध्ये बदल करणे गरजेचे आहे व तसे धोरण करण्याची मागणी मनविसे शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. ही मागणी मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांनाही ईमेल द्वारे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावर शिक्षण आयुक्तांनी स्थानिक जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी भौगोलिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.



