पुणे शहर

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे पहिल्यांदाच पुणे शहरात आले असता राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत त्यांना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारीत पुस्तके भेट दिली.

“छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असणाऱ्या पुणे जिल्ह्यात व कर्मभूमी असणाऱ्या पुणे शहरात महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांचा विना -निषेध विना- धिक्कार वावर होणे हे आम्हा शिवछत्रपतींच्या मावळ्यांना रुचणारे नव्हते. त्यामुळेच आज त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा इशारा राजभवनास आम्ही दिलेला होता असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

Img 20221202 wa00103854305520484380847

यावेळी रवींद्र माळवदकर, मृणालिनी वाणी, रुपाली पाटील, किशोर कांबळे, सुषमा सातपुते, संदीप बालवडकर, महेश हांडे, दीपक कामठे, रोहन पायगुडे, ॲड.विवेक भरगुडे, स्वप्निल जोशी, कुलदीप शर्मा आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आंदोलन  कलम १४९ अन्वये प्रशांत जगताप यांना नोटीस बजावली होती. तसेच सुमारे शंभर ते दीडशे पोलिसांचा फौज फाटा सकाळी ०७.०० वाजताच त्यांच्या वानवडीतील निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आला होता. मला ताब्यात घेण्याचा किंवा स्थानबद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न होता असे जगताप यांनी सांगितले. परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असल्याने ही संभाव्य परिस्थिती ओळखून सकाळी साडेसहा वाजताच गनिमी काव्याने घर सोडले होते.
राजभवनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार दुपारी ठीक साडेबारा वाजता आम्ही राजभवनाच्या बाहेर दाखल होत आजचे निषेध आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले.

Img 20221126 wa0212847205965836399706

पुणे शहर ही छत्रपती शिवरायांचीभूमी असून या पावन शहरात राज्यपालांचा हा उन्माद खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यपालांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आम्ही दिला, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये