रामदेव बाबांच्या ‘पतंजली’ला नेपाळमध्ये नो एंट्री; थेट काळ्या यादीत केला समावेश

काठमांडू : नेपाळने नेपाळच्या औषध नियामक प्राधिकरणाने १६ भारतीय औषध कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे, ज्यात योगगुरू रामदेव यांच्या पतंजली उत्पादनांचे उत्पादन करणाऱ्या दिव्या फार्मसीचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) औषध उत्पादन मानकांचे पालन करण्यात या कंपन्या अयशस्वी ठरल्याचे कारण यासाठी देण्यात आले आहे.
औषध प्रशासन विभागाने १८ डिसेंबर रोजी जारी केलेल्या निर्देशामध्ये नेपाळमधील स्थानिक एजंट जे या उत्पादनांचा पुरवठा करत आहेत त्यांना बोलवण्यात येणार आहे. तसेच या यादीतील कंपन्यांनी उत्पादित केलेली औषधे नेपाळमध्ये आयात किंवा वितरित करण्यात येणार नाहीत, असे त्यात नमूद केले आहे. या निर्देशामध्ये भारताच्या ग्लोबल हेल्थकेअरद्वारे निर्मित ५०० मिली आणि पाच लिटर हँड सॅनिटायझर परत पाठवण्यात आले आहेत. तसेच या कंपन्यांना आदेश दिला आहे की यापुढे नेपाळमध्ये ते विक्री करू शकत नाही.
काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्या :
दिव्या फार्मसी व्यतिरिक्त या यादीमध्ये रेडियंट पॅरेंटेरल्स लिमिटेड, मर्क्युरी लॅबोरेटरीज लिमिटेड, अलायन्स बायोटेक, कॅप्टाब बायोटेक, अॅग्लोमेड लिमिटेड, झी लॅबोरेटरीज, डॅफोडिल्स फार्मास्युटिकल्स, जीएलएस फार्मा, युनिज्युल्स लाइफ सायन्स, कॉन्सेप्ट फार्मास्युटिकल्स, श्री आनंद लाइफ सायन्सेस, आयपीसीए हेल्थकेअर, सीए हेल्थकेअर या कंपन्यांचा समावेश आहे.



