एरंडवणा गणेशनगर,ओटा वसाहत परिसरातील कारसेवकांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार

मंदार बलकवडे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
कोथरूड : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एरंडवणा गणेशनगर, ओटा वसाहत परिसरातील कारसेवकांचा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर गणेशनगर परिसर भगवामय झाला होता.
भाजपचे मंदार बलकवडे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची पूजा व महाआरती करण्यात आली. गणेशनगर ओटा वसाहत मधील कारसेवक राजाभाऊ केंडे , चंद्रकांत पवार, राज तांबोळी, योगेश गरूडकर, रूपेश मोगल यांचा सन्मान पाटील यांच्या हस्ते या प्रसंगी करण्यात आला.
चंद्रकात पाटील यांनी अयोध्येतील कारसेवा करताना घडलेले अनेक प्रसंग या वेळी नागरिकांना सांगितले.

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर व राम लल्लाच्या स्वागतासाठी मंदार बलकवडे यांच्याकडून गणेशनगर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच रस्त्याकडेच्या झाडांवरती भगव्या रंगाच्या लाइट्सचा प्रकाश सोडण्यात आल्याने संपूर्ण परिसर भगव्या रंगाने उजळून गेला होता. अतिशय चैतन्यदायी वातावरणात परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी मंगेश खराटे मधुकर टोंम्पे यांनी चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. या प्रसंगी भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर , ॲड.धर्मेंद्र खांडरे, सुनिल बारगुजे, अनिल माझिरे, संदिप मराठे, मंजुश्री खर्डेकर, प्रमिला फाले , प्राची बगाटे, संताजी खामकर , विलास फाले, अंकुश भरम, संतोष भगत, राजाभाऊ मारणे, मोहन शिगवण, पांडूरंग मोरे, ढेंम्बे, दत्ता फाले, संजय धापसे तसेच स्थानिक महिला , पुरूष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









