महाराष्ट्र

शरीरसंबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची रघुनाथ कुचिकांची धमकी; पीडित तरुणीचा आरोप

पुणे : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक (Ragunath Kuchik ) यांच्याकडून पीडित तरुणीवर दबाब आणला जातोय. गुन्हामागे न घेतल्यास शरीर संबंधांचे, फोटो , व्हिडीओ व्हायलर (Video viral) करण्याची धमकी दिली आहे. बंदुकीचा धाक दाखवत समजुतीच्या करारावर सह्या घेतल्या असल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. तर कुचिक यांना मदत करणारे सतीश दादर, अमोल गोयल, प्रवीण साळवी यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित तरुणीने केली आहे

या माहितीचा मेल.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पाठवला असल्याचेही तरुणीने म्हटले आहे. पोलीस (Police)स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस मोरे यांना मी लवकरच ही माहिती देणार असल्याचेही पीडित तरुणीने म्हटले आहे. कुचिक यांनी रोहित भिसे या मित्रासोबतही हे व्हिडिओ शेअर केले आहेत. बंदुकीचा धाक दाखवून कुचिक यांचे मित्र ऍड. अतुल शिंदे यांनी माझ्याकडून करारनामा करून घेतला. एवढंच नव्हे तर बंदुकीचा धाक दाखवताना आमच्याकडे बंदुकीचा परवाना आहे. तू आमचं काहीच वाकडं करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी करत असताना कुचिक यांच्या मुलीनेही यामध्ये सहभाग घेतला आहे. याबाबतचा ई-मेल मुख्यमंत्र्यांनाही केला आहे. यामध्ये रघुनाथ कुचिक यांना देण्यात आलेली पदे काढून घ्यावी अशी मागणी पीडितेने केली आहे. मला यापुढे काही झालं तर या सर्वस्वी रघुनाथ कुचिक हेच जबाबदार असतील, असे पीडित तरुणीने म्हटलं आहे.

Fb img 1650515749051817962385714415660
Img 20220419 wa0007968353280963622575
Img 20220419 wa0026

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये