पुणे शहर

पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार करून दरोडा; 28 लाख लंपास

पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घडना घडली आहे. गोळीबार करुन तब्बल 28 लाखांची रोकड लंपास करुन चोर पळून गेले आहे. ही घटना दुपारी घडली आहे. घडनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या दरोड्याच्या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय पोलिसांसमोर नवं आव्हान यानिमित्तानं उभं राहिलं आहे.

Fb img 1647413711531 1

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास पाच ते सहा आरोपी हे पी एम अंगडिया या कार्यालयात आले होते. हे कुरिअरचं कार्यालय असल्याची प्राथमिक माहिती आहे. याच कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केला आणि पैसे लुटून फरार झाले आहेत.

तक्रारदार हे रोज प्रमाणे सकाळी 11 च्या सुमारास कार्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी रोख रक्कम तपासली होती. काही वेळाने अचानक अज्ञात पाच ते सहा व्यक्ती त्यांच्या ऑफिसमध्ये शिरले. आरोपींनी तक्रारदाराला बंदूक दाखवली. याचवेळी आरोपींनी तक्रारदाराला कार्यालयाच्या बाहेर काढलं आणि पैसे घेऊन लंपास झाले. या सगळ्यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

Img 20221110 wa0001303173172162697740
Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये