पुणे शहर

कोरोना प्रतिबंधक लसीसाठी शिवसेनेचे पाषाणमध्ये जन आक्रोश आंदोलन

बाणेर : शिवसेनेच्यावतीने पाषाण येथे पुणे शहरामध्ये covid-19 ची प्रतिबंधक लस मुबलक प्रमाणात मिळावी यासाठी जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.

Img 20210412 wa0008

शासकीय विभागा मनतील तलाठी ऑफिस येथे तलाठी यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र व पुणे शहराला रुग्ण संख्येप्रमाणे लस मिळावेत. तसेच पाषाण बाणेर बालेवाडी परिसरातील कोरणा लसीकरण केंद्रावरती  पुरेशा प्रमाणामध्ये लस उपलब्ध करून देण्यात यावी .यासाठी  पाषाण तलाठी ऑफिस मध्ये जाऊन  निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे उपशहरप्रमुख राजेंद्र  धनकुडे, कोथरूड विधानसभा संघटक संजय निम्हण,  युवा सेना उपविभागीय अधिकारी अमित रणपिसे, उद्योजक राजेंद्र मुरकुटे उपस्थित होते.

Img 20210412 wa0007

पाषाण बाणेर बालेवाडी परिसरामध्ये लोकसंख्येच्या व रुग्णांच्या संख्येच्या तुलनेने लसीकरण केंद्रांची कमतरता आहे तसेच सध्या सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांवर देखील पुरेशी लस मिळत नाही.  लोकसंख्या व रुग्ण संख्येच्या तुलनेमध्ये पुरवठा करण्यात यावा अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

Img 20210412 wa0006
Img 20210413 wa0028
Img 20210413 wa0006
Img 20210413 wa0003

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये