पुणे शहर

कोरोना काळात सदस्य गमावलेल्या कुटुंबांना आवंती भालेकर यांच्याकडून दिवाळी फराळ किटचे वाटप..

कर्वेनगर : pune city, karvenagar कोरोना काळात सदस्य गमावलेल्या कुटुंबांना चेतन भालेकर व आवंती भालेकर यांच्याकडून दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कर्वेनगरमधील कुटुंबांना हे फराळाचे किट देण्यात आले आहेत.

घरातील प्रमुख व्यक्ती कोरोनामुळे गेल्याने अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अशी कुटुंबे दुःखातून सावरत असताना त्यांना आधार मिळावा म्हणून हा फराळ वाटप उपक्रम घेण्यात आल्याचे आवंती भालेकर यांनी सांगितले.

या देण्यात आलेल्या फराळ किटमध्ये चकली, लाडू, चिवडा, शंकरपाळी असे पदार्थ आहेत. कारोनामुळे सदस्य गमावलेल्या कुटुंबांना घरपोच हे फराळाचे किट देण्यात येत आहे.

Screenshot 2021 10 26 15 21 45 02

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये