पुणे शहर
सुप्रिया सुळेंचा खोटा फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या माजी नगरसेविके विरोधात कोथरुड राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पोलिसात तक्रार.

पुणे: कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये आज कोथरूड युवक राष्ट्रवादी अध्यक्ष गिरीष गुरुनानी यांनी शिंदे गटातील माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
शिंदे गटाच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला खोटा फोटो प्रसिद्ध केल्याचे या वेळी गुरूनानी यांनी सांगितले. त्यांनी पुरावा म्हणून फोटो ची मूळ प्रत तसेच म्हात्रे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या खोट्या फोटो ची प्रत पोलिसांकडे सुपूर्द केली.

तसेच म्हात्रे यांच्या वर कलम ५०४, ५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा व कठोर कार्यवाही व्हावी अशी विनंती करणारे पत्र त्यांनी पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या कडे दिले आहे. अशी माहिती गिरीश गुरुनानी यांनी दिली आहे.






