नवरात्रीमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांच्या आनंदात सहभागी होता आले याचे समाधान.. संगीता बराटे

कर्वेनगर : नवरात्रीमधील प्रत्येक दिवशी कर्वेनगरमधील विविध मंडळामध्ये घेण्यात आलेल्या महाभोंडला आणि पैठणीच्या लकी ड्रॉ खेळामध्ये महिलांनी सहभागी होत आनंद घेतला. प्रत्येक मंडळातील लकी ड्रॉ मध्ये ११ महिला पैठणीच्या मानकरी ठरल्या. सामाजिक कार्यकर्त्या संगीता बराटे यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कर्वेनगर मधील अखिल कर्वेनगर परिसर व शहीद मित्र मंडळ, अखिल नवरात्र उत्सव समिती व जय गणेश ग्रुप कर्वेनगर, श्री विठ्ठल रुक्मिणी नवरात्र उत्सव मंडळ, कानिफनाथ मित्र मंडळ, दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळ, अखिल हिंगणे होम कॉलनी वाघजाईमाता महिला मंडळ आणि रुद्र प्रतिष्ठान अशा विविध ठिकाणी महाभोंडला आणि पैठणीचा लकी ड्रॉ कार्यक्रम पार पडला. विविध ठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमांमधून संगीता बराटे यांनी महिलांशी मनमोकळा संवाद साधला.

संगीता बराटे म्हणाल्या, रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिला व्यस्त असतात. त्यातून त्यांना आनंदाचे क्षण मिळावेत म्हणून कर्वेनगर मधील विविध मंडळांमध्ये नवरात्रीमध्ये महिलांसाठी कार्यक्रम घेतले गेले होते. त्यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या दिवसात महिलांच्या आनंदात मलाही सहभागी होता आले याचे समाधान आहे. महिलांनी एकत्र यावे आणि समाजातील एकात्मता आणि परंपरा जपली जावी हा कार्यक्रम घेण्यामागचा हेतू होता असेही त्यांनी सांगितले.












