प्रभाग १३ हॅप्पी कॉलनी, एरंडवणा मधील डी.पी तील रस्त्यांची कामे लवकर व्हावीत यासाठी पाहणी दौरा

आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून सर्व प्रश्न सुटतील अशी हॅप्पी कॉलनी, एरंडवणा भागातील नागरिकांना अपेक्षा
कोथरुड : प्रभाग क्रमांक १३ हॅपी कॉलनी, एरंडवणा मधील जागा ताब्यात येण्यावरून रखडलेल्या रस्त्यांची व नागरिकांना जाणवणाऱ्या इतर समस्यांबाबत स्थानिक नगरसेवक व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणची पाहणी करून त्यावर मार्ग काढण्यासाठी चर्चा केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार कोथरूड मधील विविध प्रश्नांचा अभ्यास करुन ते सोडवण्यासाठी नागरिक,लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या समन्वयातून प्रयत्न सुरु आहेत.या अनुषंगाने आज प्रभाग १३ मधील डी पी रस्त्यांचे व अन्य प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे मुख्य प्रवक्ता व समस्या निवारणाचे समन्वयक संदीप खर्डेकर यांच्या पुढाकाराने प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भाजप सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, प्रभाग सरचिटणीस ॲड.प्राची बगाटे,ओ बी सी आघाडी अध्यक्ष रमेश चव्हाण यांच्यासह मनपा उपायुक्त (भूसंपादन ) डॉ.लाभशेटवार, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे, डी. पी. चे सुधीर कदम, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे, आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी वनदेवी मंदिरासमोरुन येणारा २० मीटर डी पी रस्ता, गोसावी वस्तीतून हॅपी कॉलनीतून जाणारा २० मीटर डी पी रस्ता, सहवास सोसायटीच्या नागरिकांच्या सहा मीटर चे रस्ते ९ मीटर करण्याबाबत आलेल्या नोटीशीवरच्या शंकांचे निरसन, रेवती एनक्लेव्ह येथील नागरिकांना रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणी व तेथे होणारे अपघात, भुजबळ बागेत टाकला जाणारा कचरा, क्षिप्रा चौकात होणारी वाहतूक कोंडी यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. हे सर्व प्रश्न प्रशासकीय स्तरावर सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत व योग्य पाठपुरावा करु असे नगरसेवक दीपक पोटे,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.
आम्हाला चंद्रकांत पाटील आमचे प्रश्न सोडवतील अशी खात्री वाटते असे सहवास सोसायटीतील योगिनी कर्वे, डॉ. प्रमोद मुळे, मेघराज सोसायटीचे बिपीन कवठेकर,मयूर कुलकर्णी, प्रकाश अवचट, नितीन गोखले, आसावरी, विभावरी,धनलक्ष्मी सोसायटीचे प्रभाकर उदार, सुधीर पुरंदरे,जगदीश डिंगरे, प्रबोध जोशी,उदय शिंदे,सचिन गुजर,शैलजा पाटणकर, म्हाळसकांत खळदकर, रेवती एनक्लेव्हचे अजीत महाबळ, श्रीराम कोणकर, जयंत करमरकर, अवधूत बापट, विश्वास वैद्य, हेमंत आठवले, सिद्धार्थ महाबळ, निलेश माळवदकर, अश्विनी सोसायटीचे शिवाजी अत्रे इत्यादी नागरिकांनी सांगितले.



यावेळी हॅपी कॉलनीतील टॉउन प्लॅनर शांभवी गारगोटे,चारुचंद्र गोडबोले,मिलिंद फडके यांनी तेथील प्रस्तावित रस्त्याचे व समस्यांचे अभ्यासपूर्ण सादरीकरण केले याप्रसंगी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील पंधरवड्यात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जागा मालकांची बैठक घेऊन भूसंपादनातील अडचणी दूर करुन सर्व विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात येइल असे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.






