स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने कोथरूडमध्ये मॅरेथॉनचे आयोजन
पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने कोथरूड भागामध्ये दि.१५ ऑगस्ट रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.मॅरेथॉन सकाळी ठीक ६:०० वाजता पंडित फार्म येथून सुरु होईल.अशी माहिती माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित मॅरेथॉन स्पर्धा सकाळी सहा वाजता सुरू राजाराम पुला जवळील पंडीत फार्म येथून सुरू होणार आहे.पंडीत फार्म ते म्हात्रे पूल, म्हात्रे पुल ते नळस्टॉप चौक, नळस्टॉप चौक ते महर्षी कर्वे पुतळा चौक, महर्षी कर्वे पुतळा चौक ते खंडोजीबाबा चौक आणि खंडोजी बाबा चौक ते पंडीत फार्म असा 10 किलोमीटरचा मॅरेथॉनचा मार्ग असणार आहे. यामध्ये 3 किलोमीटर, 5, किलोमीटर आणि 10 किलोमीटर असे गट करण्यात आले आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दि. १५ ऑगस्ट रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून त्यात सहभागी होण्यासाठी वर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून आपले नाव नोंदवा.मॅरेथॉन १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ६:०० वाजता पंडित फार्म येथून सुरु होईल.