
पुणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तसेच कोरोना संकटकाळात शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची असलेली प्रचंड कमतरता या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा कोथरुड मतदारसंघातर्फे रक्तदान शिबिर मनोहर मंगल कार्यालय एरंडवणे येथे आयोजित करण्यात आले होते.
कोरोनाचा काळ असूनही रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने मोठ्या संख्येने यावेळी रक्तदान केले, रक्तदान केल्यानंतर प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व कोरोना संरक्षक किट देखील यावेळी देण्यात आले.
या कार्यक्रमाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस राजेश येनपुरे, दिपक पोटे, शहर उपाध्यक्ष गणेश घोष, गणेश कळमकर, पीएमपीएमएल अध्यक्ष नगरसेवक शंकर पवार, संदीप खर्डेकर, सामाजिक कार्यकर्ते समीर पाटील, नगसेवक जयंत भावे, मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्त्रबुद्धे, अल्पना वर्पे, हर्षाली माथवड, वासंती जाधव, छाया मारणे, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजप महिला मोर्चा कोथरूड मतदारसंघाच्या अध्यक्षा व आयोजक हर्षदा फरांदे , शहर चिटणीस अनिता तलाठी, सरचिटणीस गिरीश भेलके, सचिन पाषाणकर, उपाध्यक्ष राज तांबोळी, चिटणीस अभिजीत गाडे, शुभांगी जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष दुश्यंत मोहोळ, प्रभाग १३ अध्यक्ष राजेंद्र येडे, संतोश लांडे, सुनील अभंगे, गौरी करंजकर, उल्का मोकासदार, अनुराधा येडके, कुणाल तोंडे, सायनदेव देहाद्रे, सनी लांडे, अभिजीत राऊत, तेजस मारणे, सचिन फोलानेे, रितेश वैद्य तथा मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप महिला मोर्चा कोथरूड मतदारसंघाच्या अध्यक्षा हर्षदा अभिजीत फरांदे म्हणाल्या, सदर रक्तदान शिबिर हे संपुर्णतः शासकीय नियमांचे पालन करून तसेच योग्य सामाजिक अंतर ठेऊन घेण्यात आले. हे शिबिर यशस्वी केल्याबद्दल संपुर्ण महिला मोर्चा टिम, भारतीय जनता पार्टी टिम, आयएसआय ब्लड बँक टिम व सर्व रक्तदात्यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.



