पुणे शहर

हॅपी कॉलनी येथे बांधून तयार असलेल्या स्व. बिंदुमाधव  बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात कोव्हीड रुग्णालय सुरु करण्याची शिवसेनेची मागणी …

कोथरुड : कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असून उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. कोथरुड येथील हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती परिसरात दहा वर्षा पूर्वी स्व. बिंदुमाधव बाळासाहेब ठाकरे रुग्णालय उभारण्यात आले आहे. सहा मजल्याचे या रुग्णालयाचे बांधकाम हे दहा वर्षापूर्वीच पूर्ण झाले आहे. आता सध्या या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित असून इतर मजले मात्र रिकामे आहेत. त्यामळे कोरोना रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी तातडीने कोव्हीड रुग्णालय सुरु करावे अशी मागणी कोथरुड शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. in Happy Colony.  Shiv Sena demands to start covid Hospital in Bindu Madhav Balasaheb Thackeray Hospital

या संदर्भातील निवेदन शिवसेनेच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांना देण्यात आले आहे. यावेळी शहरप्रमुख गजानन थरकुडे, सहसंपर्कप्रमुख प्रशांत बधे, कोथरुड विधानसभाप्रमुख ॲड.योगेश मोकाटे व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोव्हीडच्या धर्तीवर याच ठिकाणी सध्या लसीकरण केंद्र सुद्धा सुरु आहे. तत्कालीन आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रयत्नातून हे रुग्णालय डिसेंबर २०११ मध्ये सुरु करण्यात आले. या ठिकाणी अजून १२५०० चौ.फुट अद्ययावत रुग्णालय उभे रहावे म्हणून पुणे म:न.पा. च्या बजेट मध्ये सुद्धा तरतुद करण्यात आली होती. परंतु तरी देखील म.न.पा. ने आजतागायत दहा वर्षात या ठिकाणी रुग्णालयाच्या वरील मजल्यावरील रुग्णालयासाठी आवश्यक त्या सेवासुविधांची कामे पूर्ण न केल्याने रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा इतर मजले बंद स्थितीत आहेत.

Img 20210223 wa0156

आज कोरोना आजाराने जनता त्रस्त असताना अनेक गरजू नागरीकांना संपूर्ण पुणे शहरात बेड उपलब्ध होत नाहीत. उपचारांअभावी अनेक जणांना आपले जीव गमवावे लागत आहेत. अशा कठीण प्रसंगी पुणे महापालिका व खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचार देताना आरोग्यसुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशा वेळी स्व. बिंदुमाधव बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील बाहयरुग्ण विभाग वगळून जवळपास १५० ते २०० खाटांचे रुग्णालयाची जागा वापरा अभावी पुणे म.न.पा.कडे पडून आहे, एवढी बांधलेले रुग्णालय आपल्याकडे उपलब्ध असताना आपण इतर ठिकाणी कोव्हीड रुग्णालयाची जागा का शोधत आहोत? या ठिकाणी कोव्हीड रुग्णालय सुरु झाल्यास कोथरूड, वारजे, कर्वेनगर या उपनगरातील नागरीकांना दिलासा मिळणार असल्याचे ॲड.योगेश मोकाटे यांनी म्हंटले आहे.

करोना रुग्णांसाठी या ठिकाणी अद्यावत कोविड सेंटर त्वरित उभे करण्यात यावे व नागरीकांना त्यांच्या हक्काच्या आरोग्य सुविधा पुरवून दिलासा दयावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये